RBI Bank News : मुंबईहून आलेली एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी सध्या सर्वसामान्य ठेवीदारांमध्ये चर्चेत आहे. आपल्या आयुष्यभराच्या मेहनतीने जपून ठेवलेल्या पैशाबद्दल प्रत्येकाला भीती असते माझी ठेव सुरक्षित आहे का? बँकेला काही झालं तर माझं काय? कारण गेले काही वर्ष काही बँका डबघाईला आल्या, काहींच्या शाखांवर कुलूप लागलं, तर ठेवीदार मात्र असहाय्य. कष्टाने जमा केलेला पैसा एकदम हवेत विरल्यासारखा वाटायचा. अशा काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक महत्त्वाची घोषणा केली आहे जी लाखो ठेवीदारांसाठी मोठा दिलासा आहे. RBI Bank News
आरबीआयने देशातील सर्वात सुरक्षित, सर्वात मजबूत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या बँकांची नवी यादी जाहीर केली आहे. यांना डोमेस्टिक सिस्टिमॅटिकली इम्पॉर्टंट बँक्स (D-SIB) म्हटले जाते. साध्या भाषेत सांगायचं तर या बँका देशाच्या अर्थव्यवस्थेच्या कण्यासारख्या आहेत यांना Too Big To Fail म्हटलं जातं. म्हणजे या बँकांना काही धक्का बसला तरी सरकार आणि RBI त्यांना वाचवण्यासाठी शक्य ते सगळं करतात, कारण त्यांचा कोसळणं म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेलाच मोठा धोका.
३१ मार्च २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, या तिन्ही बँकांनी आपली सुरक्षित बँकांची मानांकन यादी कायम राखली आहे:
➡ स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
➡ HDFC बँक
➡ ICICI बँक
भाऊ, ह्याच त्या तिन्ही बँका, ज्या आजही ठेवीदारांच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित मानल्या जातात. लाखो लोकांचा पैसा, FD, RD, गृहकर्जे, पगारखाते सगळ्याचं ओझं या तिन्ही बँका मजबुतीने सांभाळतात. आणि म्हणूनच RBI त्यांच्यावर आणखी मजबूत नियम लागू करते, जे सामान्य बँकांवर नसतात.
RBI च्या नियमांनुसार या बँकांनी अतिरिक्त भांडवल राखून ठेवणे बंधनकारक आहे, म्हणजे मोठा आर्थिक धक्का बसला तरी या बँकांकडे पुरेसं सुरक्षा कवच असतं. यासाठी RBI ने त्यांना बकेट्समध्ये वर्गीकृत केलं आहे:
SBI — बकेट 4 (0.80% अतिरिक्त भांडवल)
HDFC बँक — बकेट 2 (0.40% अतिरिक्त भांडवल)
ICICI बँक बकेट 1 (0.20% अतिरिक्त भांडवल)
RBI चे हे नवे नियम १ एप्रिल २०२७ पासून लागू होणार आहेत आणि त्यानंतर देशाची बँकिंग व्यवस्था आणखी मजबूत होईल. म्हणजे भविष्यात कोणतीही आर्थिक वादळं आली, बाजार कोसळला, किंवा बाहेरची परिस्थिती बिघडली तरी या बँका ठाम उभ्या राहतील आणि ठेवीदारांचा पैसा सुरक्षित राहील.
या घोषणेनंतर देशभरात कोट्यवधी ग्राहकांनी समाधानाचा नि:श्वास टाकला आहे. कारण जेव्हा SBI, HDFC आणि ICICI सारख्या बँका सुरक्षित यादीत असतात, तेव्हा सामान्य माणसाला मन:शांती मिळते. “कष्टाने कमावलेला पैसा योग्य हातात आहे” असं वाटतं. आजच्या काळात आर्थिक सुरक्षितता म्हणजे जणू दुसरं घर.
ही तीन बँका देशाच्या आर्थिक व्यवस्थेचे मोठे आधारस्तंभ आहेत पेमेंट सिस्टीमपासून ते कर्जव्यवस्था, सरकारी योजना, व्यवसाय, पगार, हस्तांतरण… सगळं काही त्यांच्याशिवाय अपूर्ण. त्यामुळे RBI चे हे पाऊल म्हणजे ग्राहकांच्या सुरक्षिततेचा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भक्कमतेचा पाया आणखी मजबूत करणारा निर्णय आहे. एकूणच सांगायचं तर भाऊ तुझं खाते SBI, HDFC किंवा ICICI मध्ये असेल तर तू देशातील सर्वात सुरक्षित बँकांमध्ये पैसे ठेवले आहेत… हे आता RBI नेही शिक्कामोर्तब करून दिलं आहे.