Ladki Bahin Yojana News : राज्यातल्या हजारो-लाखो बहिणींना आधार देणारी ही योजना कित्येक घरात धीर आणत आली आहे. हिवाळा आला की हातात खर्च वाढतात, सणासुदीचं दिवस, मुलांचं शाळा–कॉलेज, किराणा, औषधोपचार… आणि अशात सरकारकडून आर्थिक मदतीचा हप्ता वेळेवर मिळणं म्हणजे मोठाच दिलासा. आता सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही महिने मिळून एकत्रित ₹3000 रुपयांचा हप्ता ठरलेल्या दिवशी थेट बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचं समजत आहे.
गावोगावी अंगणात बहिणींच्या चेहऱ्यावर आशेचा प्रकाश दिसतोय कारण या महिन्यात एक नाही तर दोन हप्ते एकत्र मिळणार. काही जणी म्हणतायत, “घरखर्चासाठी अगदी वेळेवर मदत मिळते, देवाचे आणि सरकारचे दोघांचेही आभार. पण या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही नियम आहेत आणि त्या नियमांमुळेच पैसे कोणाला मिळणार आणि कोणाला नाही हे ठरतं.
या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी सर्वात पहिली अट म्हणजे महिला महाराष्ट्राची कायमची रहिवासी असावी. विवाहित, विधवा, परित्यक्ता आणि अविवाहित महिला सर्वांना योजना उपलब्ध आहे, फक्त विवाहित महिलांसाठी काही वयाच्या अटी लागू आहेत. अर्ज करतानाचं वय १८ ते ६० वर्षे हे बंधन पाळावं लागणार. वार्षिक उत्पन्नाचं प्रमाणही महत्त्वाचं कुटुंबाचं उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे, तेव्हाच त्या बहिणी या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरतात.
तसेच कुटुंबातील कोणीही सरकारी सेवा किंवा आयकर भरत असेल तर लाभ मिळत नाही. कारण योजना खरंच गरजू महिलांसाठीच तयार केली आहे. अनेक वेळा लाभ अडकतो कारण कागदपत्रं अपुरी असतात—म्हणून आवश्यक कागदपत्रं तयार ठेवणं खूप महत्त्वाचं.
हे पण वाचा | शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी! राज्याचे कृषिमंत्री यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! शेतकऱ्यांना….